अमरावतीत कोरोनाचा कहर, बेफिकीरीमुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनला निमंत्रण

राज्यात सर्वाधिक संक्रमित रूग्णांची नोंद अमरावती जिल्ह्यात होत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाद्वारे बैठकांचा रतीब सुरू आहे. मात्र, जिल्ह्यात दिवसागणिक रूग्णांची संख्या वाढली तर नागरिकांच्या बेफिकीरीमुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    राज्यातील काही भागांत कोरोना विषाणूची संख्या झपाट्याने वाढत आहे. विदर्भात कोरोनाचे नवा प्रकार आढळून आला असून अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यात लॉकडाऊनला निमंत्रण देण्यात आलं आहे. अमरावतीत मुंबईपेक्षा सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत १ हजार ५५ इतके नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना ग्रस्तांचा एकूण आकडा २८ हजार ८१५ पर्यंत पोहोचला आहे.

    राज्यात सर्वाधिक संक्रमित रूग्णांची नोंद अमरावती जिल्ह्यात होत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाद्वारे बैठकांचा रतीब सुरू आहे. मात्र, जिल्ह्यात दिवसागणिक रूग्णांची संख्या वाढली तर नागरिकांच्या बेफिकीरीमुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    वर्ध्या जिल्ह्यात पुढील तीन दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली असून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार केवळ मेडिकल स्टोअर आणि तातडीच्या सेवांशी संबंधित लोकांनाच कर्फ्यूमध्ये फिरण्याची परवानगी असणार आहे. याशिवाय सर्व काही बंद होईल. यावेळी सरकारने पेट्रोल पंप बंद ठेवण्याचे आदेशही दिले आहेत.