नगरसेवक निसार खान यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

कारंजा,
कारंजा नगर परिषदेचे  नगरसेवक निसार खान नजीर खान यांनी एका 27 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्या  प्रकरणी महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली असून निसार खान यांच्यावर छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फियादी महिला ही आपल्या घरकामा निमित्त बाहेर जात असताना निसार खान हे नेहमी पाठलाग करत होता. पाठलाग का करतोस असे म्हटल्यास तो म्हणाला की हा माझा नेहमीचा मार्ग आहे. असे बोलल्यावर त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र 10 जुलै रोजी निसार खान यांनी मला तुझा मोबाईल नंबर दे म्हणत असभ्य वागणूक करून सदर महिलेचे विनय भंग केला. पिडीत महिलेच्या तक्रारी वरून कारंजा पोलिसांनी कलम 354, 354 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार सतीश पाटील यांचा मार्गदर्शनाखाली कारंजा शहर पोलिस करीत आहे.