पुरात अडकलेल्यांना पोहोचविले साहित्य

चामोर्शी. मार्कंडा देव मार्गावर असलेल्या गजानन महाराज देस्थान येथे पुरामुळे अडकलेल्या काही लोकांना मार्कंडा येथील  आपत्ती विभागाच्या बोट चालक नीलकंठ सरपे, गुरू सरपे, ढुमदेव सरपे, माणिक कोहळे, नेहरू राणे, रवी चापले व उज्ज्वल गायकवाड यांनी १३२ पॉवर सप्लायच्या कर्मचा-यांनी पाणी, चहा इतर साहित्य पोहोचविले. आपत्ती व्यवस्थापनच्या पथकाने गजानन महाराज ३ व शंकरपूर येथील ३ लोकांना सुखरूप बाहेर काढून त्यांच्या नातेवाईकाच्या स्वाधीन केले. यावेळी तहसीलदार संजय गंगथडे, मंडळ अधिकारी फुलझले, तलाठी मेश्राम, कालिदास सरपे व आपत्ती व्यवस्थापन पथक उपस्थित होते.