आग लागून  सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान  

  • खिड़कीचे कांच फोडून आग विझविण्याचा प्रयत्न

हिंगणघाट (Hinganghat). स्थानिक महावीर वार्ड येथील सेवानिवृत शिक्षक सुरेश दौलतकार यांचे निवस्थानास आग लागुन सुमारे एक लाख रूपयाचे नुकसान झाले. शार्टसर्किटने आग लागल्यामुळे सदर दुर्घटना घडली असल्याची माहिती आहे. आज  महावीर वार्ड येथील दौलतकार यांचे घरातून भल्या पहाटे ५ वाजताचे चे दरम्यान परिसरातील नागरिकांना आग लागल्याचे निदर्शनास आले.

उपस्थित नागरिकांनी खिड़कीचे कांच फोडून आग विझविण्याचा प्रयत्न केला, यावेळी नगरपालिका अग्निशमन विभागाससुद्धा पाचारण करण्यात आले. अग्निशमन पथक आल्यावर आग आटोक्यात आली.दौलतकार कुटुंबीय हे काही धार्मिक कार्यासाठी बाहेरगावी गेले असता घरी कुणी नसताना उपरोक्त घटना घडली.

नागरिकांनी दौलतकार यांना मोबाइलवरुन सदर प्रकार कळला असता ते कुटुंबासह निवासस्थानी परतले. घरातील टीव्ही, फॅन, सोफा, शोकेस, मोबाइल संच तसेच अश्या अनेक गृहोपयोगी वस्तु आगीत जळल्या असल्याचे त्यांना नजरेस आले.  शार्ट सर्किटने लागलेल्या सदर आगीमधे सुमारे एक लाख रूपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.