yawatmal corona death

  • रॅपीड ॲन्टीजेन टेस्ट लॅबमधील ३ डॉक्टर पॉझिटिव्ह!
  • एकाच डॉक्टरच्या भरवशावर लॅबचा कारभार सुरू  

अकोला. जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढतच चालला असून, दररोज शंभराच्यावर बाधित रूग्ण आढळून येत असल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे. काल सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांचे पती डॉ. इंदुप्रकाश गजभिये यांचे कोरोनामुळे निधन झाल्याचे वृत्त धडकले.

सर्वोपचार रुग्णालयाच्या अतिदक्षता कोविड वॉर्डात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, सर्वोपचारच्या रॅपीड ॲन्टीजेन टेस्ट केल्या जात असलेल्या प्रयोगशाळेतील तीन डॉक्टर या आठवडाभरात पॉझिटिव्ह आले असून, सध्या केवळ एकाच डॉक्टरच्या भरवशावर या प्रयोगशाळेचा कारभार सुरू असल्याचे समजते.

जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये कोरोनाने आपला विळखा घट्ट केला असून, सप्टेंबरच्या दुसरया पंधरवड्यात दररोज शंभराच्यावर बाधित रूग्ण आढळून येत असल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. शहरी भागांमध्ये भरतिया रूग्णालय आणि आयएमएमध्ये संशयीत रूग्णांची तपासणी केली जात असून, जिल्ह्यात आता बाहेरगावाहून येणारया लोकांचे लोंढे कमी झाल्याने तपासणीचे प्रमाण घटत चालले आहे.

रविवारी तर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर एकाही व्यक्तीची तपासणी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. दुसरीकडे कोरोनाने पुन्हा रौद्ररूप धारण केले असून, गेल्याच आठवड्यात शहरातील प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. उदय नाईक यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्याचप्रमाणे काल मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांचे पती डॉ. इंदुप्रकाश गजभिये यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने कोरोनाच्या विदारक परिस्थितीची कल्पना यावी.
सर्वोपचारच्या रॅपीड ॲन्टीजेन टेस्ट केल्या जात असलेल्या प्रयोगशाळेतील चार पैकी तीन डॉक्टर या आठवडाभरात पॉझिटिव्ह आले असून, सध्या केवळ एकाच डॉक्टरच्या भरवशावर या प्रयोगशाळेचा कारभार सुरू असल्याचे समजते. दरम्यान, कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम जिल्ह्यात सुरू केली असून, त्या पार्श्वभूमीवर आता सर्वांनी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपापली काळजी घेणे आवश्यक झाले आहे.