कलावंतांना मानधन देण्याची मागणी

बुलडाणा, 

वृद्ध कलावंतांच्या आर्थिक परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून त्यांचे मानधन तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी सरचिटणीस, तथा जिप सदस्य अ‍ॅड.जयश्री शेळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

शासनाने वृद्ध कलावंतांना आपला उदरर्निवाह करता यावा यासाठी मानधन योजना सुरू केली आहे. सद्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातले आहे. याचाच परिणाम म्हणून हातचे काम गेल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली असून

वृद्ध कलावंतांवरही तशीच वेळ आली आहे. त्यांना तीन महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. त्यांच्याकडे या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मानधनाव्यतिरिक्त कोणताही दुसरा अर्थार्जनाचा मार्ग नाही. वृद्ध कलावंतांच्या आर्थिक परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून त्यांचे मानधन तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी शेळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.