आज सायंकाळी चार वाजता राष्ट्रीय कर्करोग रुग्णालयाचे संचालक डॉ. आनंद पाठक यांच्याशी चर्चा

नागपूर,

कोरोना महामारीने आज भारतासह संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. दररोज हजारो लोक कोरोनाच्या विळख्यात सापडत असून अनेकांना आपले प्राणही गमवावे लागत आहे. कोरोनाच्या या महामारीत देव डॉक्टरांच्या रूपाने कार्य करत आहेत. लोकांचे जीव वाचावीत आहेत. सध्या तरी या महामारीवर सुरक्षितता आणि सावधगिरी हा एकमेव उपाय आहे.

आपल्याला या रोगाला घाबरण्याची नाही तर लढण्याची गरज आहे. कोरोना संक्रमांबद्दल नकारात्मक विचार न करता सकारात्मकतेने यावर मत करायची आहे. लोक जितके सतर्क राहतील तितकाच संक्रमित होण्याचा धोका कमी असेल. आज जगभरात या विषाणूबद्दल जितका तणाव आहे त्या तुलनेत भारतात याची तीव्रता कमी आहे, याचे कारण म्हणजे येथे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे बरे होणाऱ्यांची आकडेवारी हे आहे. 

या महामारीवर अधिक विश्लेषण देण्यासाठी नॅशनल कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक डॉ. आनंद पाठक  ‘कोरोना के दौरान संक्रमण की रोकथाम और नियंत्रण’ या विषयावर मागगदर्शन करणार आहेत. नवभारतच्या  ‘मन में है विश्वास’या  विशेष फेसबुक लाईव्ह (https://www.facebook.com/MannMeinHainVishwas/ ) कार्यक्रमात आज १७ जुलैला संध्याकाळी चार वाजता आपल्याला मार्गदर्शन करतील. 

डॉ. पाठक अमेरिकन सोसाइटी ऑफ़ क्लिनिकल ऑन्कोलॉजीचे सदस्य आहेत. या सोबतच ते यूरोपियन सोसाइटी ऑफ़ मेडिकल ऑन्कोलॉजी और इंडियन कोआपरेटिव ऑन्कोलॉजी नेटवर्कचेसुद्धा सदस्य आहेत.