अल्लीपूर येथे महिला बचत गटास मिनी ट्रॅक्टरचे वितरण

  • महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्दात्त हेतूने  ट्रॅक्टरचे वितरण

वर्धा. (Wardha)   जिल्ह्यातील अल्लीपूर (Allipur) येथील पंचशील महिला बचत गटास (Panchashil Women saving group) अलीकडेच मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्यात आला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य अनुसूचित जाती (S.C.) आणि नवबौध्द (Nav Buddhist) घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटाकडून या साहित्यांचे वितरण करण्यात आले आहे.

महिला आर्थिक विकास महामंडळ, उड्डाण लोकसंचालित साधन केंद्र हिंगणघाट यांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्दात्त हेतूने  ट्रॅक्टरचे (tractor distribution) वितरण करण्यात आले आहे. अनुसूचित जाती आणि नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना नव्वद  टक्के शासकीय अनुदानावर नऊ  ते अठरा अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटॅव्हेटर व ट्रेलर याचा पुरवठा सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात आला. अल्लीपूर येथील पंचशील महिला बचत गट यांनी वर्षभरापूर्वी या योजनेचा लाभ घेण्यासाठी बचत गटातील अध्यक्ष, सचिव व सदस्य यांचे राष्ट्रीयकृत बँकेशी बँक खाते क्रमांक (Centralized Bank account) आधार कार्डशी (Aadhar Cards) संलग्न करून शासन निर्णयानुसार रक्कम भरून मिनी ट्रॅक्टरची मागणी केली होती. त्यांच्या कागद पत्राची पुर्तता करून नुकताच महिलांना मिनी ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले.