सर्व शिक्षा अभियान अंतर्गत पाठ्यपुस्तकांचे वाटप

यवतमाळ,

सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत बोरी येथील बाबा अरब साहब उर्दू हाय स्कूल येथे मोफत पुस्तक वाटप करण्यात आले.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा शाळा सुरु होण्याची आशा धुसर आहे. असे असली तर जिल्ह्यात सर्व तालुक्यातील शाळांना दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आले आहे. यामध्ये पहिली ते आठवी पर्यंत विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात आली.  यावेळी बोरी येथील माजी पंचायत समिती सदस्य तथा ग्रामपंचायत सदस्य ओम प्रकाश लढ्ढा . शाळेचे मुख्याध्यापक खालीद अहमद शेख व पालकमध्ये फिरोज शाह. कैसर खान शाळा कर्मचारी मधून एरार शेख, रियाज शेख. वकार अहमद. जुबेर शेख हे उपस्थित होते.