जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा गडचिरोली दौरा

  • जिल्हा प्रशासनाबरोबर चर्चा करतील.

गडचिरोली. (Gadchoroli ).   जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगर विकास व सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी, तसेच पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गडचिरोली येथे आले होते. त्यांनी सायंकाळी  पूरस्थिती निर्माण झालेल्या काही ठिकाणी भेट देऊन जिल्हा प्रशासनाबरोबर चर्चा केली.

गडचिरोली तालुक्यातील पारडी, कनेरी या भागातील पूरपरिस्थितीची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी जिलाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे उपस्थित होते. या भागातही वैनगंगा नदीकाठावरील शेतीतील पिके गेल्या दोन दिवसांपासून पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याची माहिती पारडी गावचे सरपंच संजय निखारे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.