अतिवृष्टीमुळे मारेगांव येथील शेतक- याचे घर जमीनदोस्त

मारेगाव. दोन आठवडे सतत पाऊस आल्याने ग्राम नविन मारेगाव येथे  मधु सुकराम पुंडे यांचे घर जमीनदोस्त झाल्याने या  गरीब शेतक-याचा संसार उघडा पडला आहे.  शासनाने त्यांना त्वरित मदत करावी अशी मागणी मधु पुंडे यांनी केली आहे.
मारेगांव येथील रहिवासी मधु पुंडे मोल मंजुरी करून आपल्या संसाराचा गाडा ओढीत आहेत. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय ठप्प झाल्याने हाताला काम नसल्याने आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. अशा परिस्थितीत निसर्गाने सुद्धा डोक्यावरील छत हिरावून घेतल्याने ते मोठ्या संकटात सापडले आहे. शासनाने त्वरीत मदत करावी अशी मागणी पुंडे यांनी केले आहे.