सरकार पडणं इतकं सोपं काम असतं का?- सुधीर मुनगंटीवार यांचा सवाल

नागपूर, 
मध्यप्रदेशमध्ये सुरु असलेल्या राजकीय नाट्यानंतर महाराष्ट्रातल्या ठाकरे सरकारलाही सुरुंग लागण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.  यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.  ‘सरकार पाडणं इतकं सोपं असतं का? असं सांगतानाच सरकार पाडणं इतकं सोपं असतं तर देशातील सर्व विरोधकांनी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार कधीच पाडलं असतं, असे विचारात सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिपक्षाच्या  नेत्यांचा चिमटा काढला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिलेल्या एका मुलाखतीत ऑपरेशन लोटसवर भाष्य केले  होते. तर संजय राऊत यांनीही ऑपरेशन लोटसवरून भाजपवर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर सुधीर मुनंगटीवार यांनी ही टीका केली आहे. सरकार पडण्याची आघाडी सरकारच्या मनात एवढी भीती का आहे? असं कोणतंही सरकार पाडता येतं का? सरकार पाडणं एवढं सोप्पं असतं तर देशातील सर्व विरोधकांनी एकत्र येऊन २४ तास काहीही न खाता-पिता बैठकांवर बैठका घेऊन केंद्रातील मोदी सरकार एव्हाना पाडलं असतं, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.