पशुधनावर ‘लंपी स्कीन’ चे थैमान; शेतकरी संकटात

  •  तालुक्यातिल अनेक पशु रुग्णालयात डॉक्टरच नाही...

देवरी. देवरी तालुक्यात पशूधनावर ‘लंपी स्कीन डिसीज’ (lumpy skin diseases)  विषाणूजन्य साथीच्या आजाराचा प्रवेश झाला आहे. सदर आजारावर प्रतिबंधात्मक लस किंवा ठोस औषधोपचार (treatment) उपलब्ध नसल्याने याचा परिनाम  लहान वासरांमध्ये अधिक तीव्र होत चालला असल्याचे दिसून येते आहे .
लंपि स्किन डिसीज हा विषाणूजन्य साथीचा आजार असुन या आजाराचा प्रसार एका बाधीत पशूधनापासून दुसऱ्या पशूधनाला डास, चावणाऱ्या माशा व गोचीड यांच्यामार्फत होतो. विशेषत: उष्ण व दमट हवामानात याचा प्रसार जास्त प्रमाणात होत असल्याचेही काही पशु वैद्यकीय अधिकार्यांचेही म्हनने आहे.

लपीं स्कीन आजाराने बाधीत झालेल्या जनावरांना डोके, मान, पोट, पाठ, पाय तसेच शेपटी खाली त्वचेवर दोन ते पाच सेंटीमीटर व्यासाच्या गाठी येतात व काही दिवसांनी त्यामधून पस येऊ शकतो. नाकाच्या व तोंडाच्या आतील भागामध्ये गाठी आढळून येतात. ग्रंथीला सूज येणे पुढील व मागील पायावर सूज असणे व पोळीला सूज येणे अशीही लक्षणे प्रामुख्याने आढळतात. तसेच ताप येतो, डोळ्यातून तसेच नाकातून स्त्राव गळणे, भूक मंदावणे, योग्य उपचार झाल्यास यामध्ये मरतुकीचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. बाधित होणारे पशुधन आजार प्रामुख्याने सर्व वयोगटातील संकरीत व देशी गाय वर्ग, म्हैस वर्गातील पशुधनास होऊ शकतो. लहान वासरांमध्ये याची तीव्रता अधिक नसते. पशुधनास बाधा होण्याचे प्रमाण दहा ते वीस टक्के असून लागण झालेल्या जनावरांना मृत्यू होण्याचे प्रमाण एक ते पाच टक्के एवढे आहे. अशा प्रकारची लक्षणे आढळून आल्यास बाधित पशूधन तात्काळ इतर पशूधनापासून अलग करणे आवश्यक असले तरी तालुक्यातील जनावरांच्या डॉक्टरांच्या कमतरतेमुळे शेतकरी व पशुधन पाळनार्या लोकान करीता चिंतेची बाब निर्माण झाली आहे.

पशुधनाची वाहतुक व विक्री थांबविने गरजेचे

साथ भागातील पशूधनाची वाहतूक व विक्री थांबवणे आवश्यक आहे. रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी रोगाचा प्रसार करणारे कीटाणू जसे डास, माशा व गोचीड यांचे निर्मूलनासाठी आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे. बाधित पशूधन व सामान्य पशूधन चराईसाठी एकत्र सोडू नये. हा आजार कीटकांपासून प्रसार होत असल्याने आपल्या गोठ्यातील कीटकांचा बंदोबस्त करावा लागेल. त्यासाठी जनावरांचा गोठा कोरडा आणि स्वच्छ ठेवावा लागेल. तसेच गोठ्याशेजारी पाणी, शेण, मुत्र जमा होवून चिखल होणार नाही याची काळजी घ्यावी. गोठ्यात असलेले कीटक मारण्यासाठी कीटनाशकांचा वापर करावा. सद्यस्थितीत यावर प्रतिबंधात्मक लस किंवा औषधोपचार उपलब्ध नाही. तथापि आजारी पशुधनाच्या लक्षणानुसार उपचार केल्यास दोन ते तीन आठवड्यामध्ये पशूधन पूर्णपणे बरे होऊ शकते.

सदरचा आजार पशूधनापासून मानवास होत नाही. हा आजार शेळ्यामेंढ्या व मानवास होत नाही. प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रतिबंधक उपाय योजनेकरिता घरच्या घरी कीटकनाशक बनविण्यासाठी एक लीटर पाण्यात ४० मिली करंज तेल, ४० मिली निम तेल आणि १० ग्राम अंगाची साबण चांगली मिसळून घ्यावी. हे द्रावण ०,३ व ७ व्या दिवशी पशुधनावर फवारल्यास आपल्या गोठ्यामध्ये सर्व प्रकारच्या कीटकांचे निर्मूलन होते व रोगाचा प्रसार रोखण्यासाठी मदत होऊ शकते.