corona virus

  • सेलू शहरात तिसरा रुग्ण

 सेलू. शहरांमध्ये एक दिवसाआड सतत पॉझिटिव पेशंट मध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सेलू शहरातील विकास चौक खोडके लेआउट मधील ५० वर्षीय महिला दोन दिवसापूर्वी ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रकृती ठीक नसल्याने गेली होती. तिच्यात कोरोनाची लक्षणे असल्याने तिचा स्त्राव तपासणीसाठी पाठविला असता आज तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. स्थानिक प्रशासनाने ग्रामीण रुग्णालयाचा तसेच खोडके लेआउटचा   परिसर निरजंतुक केला आहे. रुग्णाला सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले असून, जवळपास पंधरा जणांना गृहविलगिकरणात ठेवण्यात आले आहे.