अखेर नवव्या दिवशी सिटीपीएस प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन मागे

चंद्रपूर. कायमस्वरूपी नोकरीच्या मागणीसाठी ७ सिटीपीएस प्रकल्पग्रस्तांनी  ऊर्जा भवनाच्या चिमणीवर चढून आंदोलन केले. या आंदोलनाचा आजचा नववा दिवस होता. ऊर्जा मंत्री नितीन राऊत, पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि खासदार सुरेश धानोरकर यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले. 

सिटीपीएस प्रकल्पाला दिलेल्या जमिनीच्या बदल्यात कुटुंबातील एकाला कायमस्वरूपी नोकरीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र बराच काळ लोटूनही याची पूर्तता न झाल्याने ५ पुरुष आणि २ महिला असे ७ प्रकल्प पिडीतांनी ऊर्जा भवनाच्या २७५ मीटर उंचीच्या चिमणीवर चढून आंदोलन केले. भोजन आणि पाण्याच्या अभावामुळे त्यांचे स्वस्थ खालावत गेले. विशेष म्हणजे या आंदोलनाला काही राजकीय तसेच सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळाल्याने ते चर्चेत आले होते.