हिंगणघाटमध्ये सेवानिवृत्त शिक्षकाच्या घराला आग; लाखोचा मुद्देमाल राख

हिंगणघाट (Hinganghat).  स्थानिक महावीर वार्ड (Mahavir ward, Hinganghat) येथील सेवानिवृत शिक्षक सुरेश दौलतकार (Teacher Suresh Daulatkar) यांचे निवासस्थानास आग लागून सुमारे एक लाख रूपयाचे नुकसान झाले. शार्टसर्किटने आग (Fire due to short circuit) लागल्यामुळे सदर दुर्घटना घडली असल्याची माहिती आहे. आज महावीर वार्ड येथील दौलतकार यांचे घरातून भल्या पहाटे ५ वाजताचे चे दरम्यान परिसरातील नागरिकांना आग लागल्याचे निदर्शनास आले. उपस्थित नागरिकांनी खिड़कीचे कांच फोडून आग विझविण्याचा प्रयत्न केला, यावेळी नगरपालिका अग्निशमन विभागाससुद्धा (Municipal corporation’s fire bridge ) पाचारण करण्यात आले. अग्निशमन पथक आल्यावर आग आटोक्यात आली.

दौलतकार कुटुंबीय हे काही धार्मिक कार्यासाठी बाहेरगावी गेले असता घरी कुणी नसताना उपरोक्त घटना घडली. नागरिकांनी दौलतकार यांना मोबाइलवरुन सदर प्रकार कळला असता ते कुटुंबासह निवासस्थानी (residential house) परतले. घरातील टीव्ही, फॅन, सोफा, शोकेस, मोबाइल संच तसेच अश्या अनेक गृहोपयोगी वस्तु आगीत जळल्या असल्याचे त्यांना नजरेस आले. शार्ट सर्किटने लागलेल्या सदर आगीमधे सुमारे एक लाख रूपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.