पाच दिवसांचा जनता कर्फ्यू

लोणारमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढला

लोणार,

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लोणार तालुक्यात बुधवारपासून पाच दिवस जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यादरम्यान बाहेरगावावरून येणाऱ्यांना 14 दिवस क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचे तहसीलदार सैपन नदाफ यांनी सांगितले. लोणार येथे व्यापारी व नागरिकांच्या बैठकीत तहसीलदार सैपन नदाफ, मुख्याधिकारी विठ्ठल केंदारे, पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मापारी, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा. बळीराम मापारी, भारतीय काँग्रेस तालुकाध्यक्ष तथा जिप सदस्य राजेश मापारी, नगरपालिका उपाध्यक्ष बादशाखान नुरमहम्मदखान, नगरपालिका गटनेते भूषण मापारी, कृ. उ. बाजार समितीचे डॉ. अनिल मापारी, साहेबराव पाटोळे, समिती सभापती संतोष मापारी, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष कैलास बचाटे, बबलु बोरा, रोशन गेलडा, प्रंशात बनमेरू, गोपाल तोष्णीवाल, गजाजन खरात उपस्थित होते. सुलतानपूर, हिवराखंड, भुमराळा, अंजनी खुर्द, ब्राम्हणचिकणा या गावामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. जनता कर्फ्यू दरम्यान प्रशासनाने कारवाई केल्यास राजकीय पुढारी अथवा लोकप्रतिनिधीनी शिफारशी करू नये असे ठरले.