काळ्या बाजारात जाणारा पाच लाखांचा तांदूळ केला जप्त

डीवायएसपीच्या विशेष पथकाची कारवाई

अकोला,

शहरातून धान्य मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येते. यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या. यासंदर्भात माहिती मिळताच, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांच्या विशेष पथकाचे प्रमुख अमित डहारे यांनी प्रभात किडस् ते अमनदीप ढाबादरम्यान नाकाबंदी केली. यावेळी अकोला येथून शासकीय स्वस्त धान्य प्रणालीचा तांदूळ काळ्या बाजारात विक्री करण्याकरीता नेणारे वाहन पकडले.

 आरोपी सदाम खान शब्बीर खान रा. वाशीम बायपास, अकोला व  सैयद यासीन सैयद सैफुद्दीन रा. नवाबपुरा अकोला यांच्या ताब्यातून अंदाजे 15 क्विंटल तांदळासह इतर असा एकूण 5 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरुद्ध जुने शहर पोलिस ठाण्यात कलम 3,7 जीवनावश्यक कायदा 1955 अंतर्गत  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनात उप विभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांच्या विशेष पथकाने केली.