धान्य चोर पोलिसांच्या जाळ्यात

 एलसीबीची कारवाई : 12 अटकेत

अकोला,

बाळापूर तथा बोरगांव मंजू परिसरातील गोडाऊमधून धान्याची चोरी करणाऱ्या 12 चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनात पकडण्यात आले आहे. विठ्ठल मेहेंगे, विश्वनाथ चौके, पंजाबराव बघे, निलेश बघे, आकाश बिलेवार, श्याम सरीसे, श्रीधर पठाण, निवृत्ती घटे, गजानन कोठारे, ज्ञानदेव बघे, श्रीकृष्ण करांगळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

दोन पोलिस ठाण्याच्या हद्दीतून 6 घटनांमध्ये 11 लाख 60 हजारांचा माल चोरी गेला होता. पोलिसांनी सहा घटनांमध्ये वापरलेल्या दोन बोलेरो पिकअप वाहन व एक दुचाकी (अंदाजे किंमत 10 लाख 30 हजार) 17 लाख 88 हजार रुपयांचे धान्य जप्त केले आहे.

पीएसआय तुषार निवारे, पीएसआय सागर हटवार, शक्ति कांबळे, मनोज नागमोते, संदीप पाटकर, दत्ता ढोरे, किशोर सोनोने, संदीप ताले, वसीम शेख, महिला पोलिस कर्मचारी गीता अवचार यांनी सापळा रचून या आरोपींना पकडले.