मुसळधार पावसाने कडुलिंबाचे वृक्ष कोसळले घरावर

हिंगणघाट. काल रात्रिपासुन सुरु असलेल्या संततधार पावसाने स्थानिक एक्सिस बैंक चौकातील गांधी वार्ड येथील रहिवाशी पत्रकार प्रा. संदीप रेवतकर यांच्या  घरावर आज दुपारी १ वाजताच्या सुमारास १०० वर्षे जुने कडुलिबाचे झाड कोसळले. सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची प्राणहानी झाली नाही. परंतु रेवतकर यांचे घराचे काही प्रमाणात नुकसान झाले.  सुभाष चौक ते तुकडोजी  पुतळा दरम्यान शहरातील रस्ता  बांधकाम सुरु आहे. या अंतर्गत रस्त्याच्या  दोन्ही बाजूला फूटपाथ करिता खोदकाम सुरु आहे.परंतु काम अंत्यात संथगतीने सुरु आहे.  फुटपाथ बांधकामाकरिता तब्बल महिन्याभरापासुन केलेले खोदकामानंतर जैसे थे परिस्थिती आहे. त्यामुळे झाडांची मुळे उघडी पडल्याने या मार्गावरिल अनेक वृक्ष कोसळण्याची शक्यता आहे. याबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत. परंतु नागरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे सदश्य तथाकथित वृक्षप्रेमी मात्र या बाबत गांभीर्याने घेत नाही. जीर्ण झालेले वृक्ष कापन्यास अडथळा निर्माण करीत आहे. असा नागरिकांचा आरोप असुन अहवाल देण्यास सुद्धा हेतुपुरस्पर दिरंगाई करीत आहे. याकडे पालिका प्रशासनाने लक्ष्य देण्याची गरज आहे.