महावितरण केंद्रासमोर वीज बिलाची केली होळी

आर्णी, 

लॉकडाऊनच्या काळातील भरमसाठ वीज बिले देऊन कंपनीने नागरिकांना मोठ्या पेचात टाकले आहे. आधीच जनतेची आर्थिक कोंडी सुरू आहे.  अशातच वीज कंपनीने अवाढव्य वीज बिल पाठवल्याने आज आर्णी मनसेकडून महावितरण कंपनी आर्णी समोर बिलाची होळी करण्यात आली.

याप्रसंगी आर्णी तालूकाध्यक्ष सचिन यलगंधेवार, शहराध्यक्ष राहुल ढोरे, उपाध्यक्ष संतोष राऊत, सुरज राठोड, अक्षय भारती, मोहन ठाकरे, सलमान खान, आलीम शाहा, नितिन बोक्से आदी मनसे पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.