विहिरीतुन निघत आहे गरम पाणी

  • बाबुळगावच्या कोपरा जानकर येथिल प्रकार

यवतमाळ.  सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहे. अनेक भागात ढगाळ वातावरणामुळे गारठा निर्माण झाला आहे. असे असताना एखाद्या विहिरीतून गरम पाणी (hot water) येत असेल तर आश्चर्यच म्हणावे लागेल, कारण असाच काहीसा प्रकार बाबुळगाव (babulgaon) तालुक्यातील कोपरा जाणकर येथे उघडकीस आला आहे. काल शुक्रवारपासून हा प्रकार सुरु आहे. त्यामुळे विहिरीतून निघणारे गरम पाणी पाहण्यासाठी गावात नागरिकांची गर्दी होत आहे. हा प्रकार प्रशासनाने गांभीर्याने घेतला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात बाबुळगाव तालुक्यातील कोपरा जानकर येथे शुक्रवारी २८ ऑगष्टला गावातील सार्वजनिक विहिरीवर एक व्यक्ती हा पाणी आणण्यासाठी गेला. तेव्हा विहिरातून बादलीभर पाणी काढले असता, ते गरम असल्याचे दिसुन आले. संबधीतांने ही बाब लगेच गावक-यांना सांगितली तेव्हा गावातील नागरीकांनी विहिरीकडे धाव घेत प्रत्यक्ष पाहणी केली असता, त्यांनी देखिल आश्चर्य व्यक्त केले. विहिरातुन निघत असलेल्या पाण्याबाबत गावातील अनेकांनी तर्क वितर्क केले. सुरुवातील काहींनी तर विहिरीमध्ये लागुन असलेल्या ईलेक्ट्रील मोटरपंपामुळे पाणी गरम येत असल्याचा निष्कर्श काढला. तर पहाटेच्या वेळी साधारणत: पाणी गरम राहत असल्याचे देखिल सांगण्यात आले. त्यामूळे गावक-यांनी दिवसाभर विशिष्ट कालावधीनंतर विहिरीतुन पाणी काढुन निरीक्षण केले. तेव्हा पाणी गरमच येत असल्याचे निदर्शानास आले. विशेष म्हणजे शुक्रवारी दिवसाभर पाऊस आली ढगाळ वातावरण होते. असे असतांना पाणी गरम येत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. आज २९ ऑगष्टला देखील विहिरातुन गरम पाणी येत असल्याचे स्थानिक नागरीकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामूहे गावातील नागरीक याला दैवी चत्मकार असल्याचे सांगत आहे. याप्रकाराबाबत स्थानिक तहसिलदार, बीडोओ यांनी माहिती दिली. मात्र त्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नसल्याचे सांगण्यात येत असुन अद्यापपर्यंत प्रशासनाने पाहणी देखील केली नाही.

विहिरातुन अथवा बोअर वेलमध्ये गरम पाणी येणे हा कुठला चत्मकार नसून ती एक भौगोलिक क्रिया आहे. यापूर्वी देखील असे प्रकार उघडकीस आले आहे. साधारणत: जमिनीत किंवा विहिरीमध्ये पोकळी (गॅप) निर्माण होऊन त्यामध्ये उष्ण हवा साठविली जाते. त्यामुळे ही हवा बाहेर आल्यास काही वेळ गरम पाणी राहण्याची शक्यता असते. तरी देखील पाण्याचे नमुने तपासणी केल्यानंतर या प्रकाराबाबत सविस्तर सांगता येईल.

राजेश साळवे, भूजल सर्वेक्षक अधिकारी, यवतमाळ