अकोल्यात मुलींनी मारली बाजी

नोएल स्कूलचा शंभर टक्के निकाल

अकोला,

सीबीएसई 10 वीच्या बुधवारी जाहीर झालेल्या निकालात नोएल स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यंदा परीक्षेसाठी 84 विद्यार्थी प्रविष्ट झाले. यापैकी 26 विद्यार्थ्यांनी 90 टक्केपेक्षा अधिक गुण प्राप्त केले. सायली खेडकर हिने 98.40 टक्के गुणांसह शाळेतून प्रथम येण्याचा मान पटकावला.

रुजल गावंडे 98 टक्के, कोमल पवार 97.29 टक्के, साक्षी दाबेराव 96.40 टक्के, करिश्मा चव्हाण 96.20 टक्के, कविता इंगळे 95.60, श्रेयस दिखोंडवार 95.60, खुशी झिने 95.20, माधव सोनोने 95, मृणाल मानकर 94, मृणालिनी मुसळे 94, खुशी मेहता 93, वेदांत गायकवाड 93.80, देवेश वानखडे 93, हर्षल धवले 93, प्रगती जाधव 92, रिद्धी सोमानी 92, सुशील इंगोले 92, साहील कुकडे 92.40, अभय भगत 92.20, गुंजन गुरबाणी 92, संस्कृती सावळे 91, संस्कृती जामनिक 91.60, रोहण टाले 91.60, अर्णव आखरे 91.40, लोकेश चौधरी 91.40 टक्के गुण घेत प्रावीण्य प्राप्त केले. हे यश संपादन करण्यासाठी रुपाली कुकडे, सुनीता राऊत, राकेश थापा, कुलदीप देशमुख, आकांक्षा सरदार यांनी परिश्रम घेतले. सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचे प्राचार्य अमोश मनवर यांनी अभिनंदन केले.

एमराल्ड हायस्कूलचा निकाल शंभर टक्के

सीबीएसई 10 वीच्या निकालात एमराल्ड हायस्कूलचे 14 विद्यार्थी प्रथम श्रेणीत आले. वैष्णवी राठोडने  97 टक्के गुण प्राप्त करीत शाळेतून प्रथम येण्याचा मान पटकावला. शंतनू जावेद द्वितीय 95.7, श्रुती कंकालने 94 टक्केसह तृतीय स्थान प्राप्त केले. याशिवाय तन्मय नवघरे 94.8, राशी निले 92.8, वसुधा धानोरकर 92.8 टक्के, सुमित खडे 92.5 टक्के, अमित वर्मा 92.5 टक्के, मनाली पाटील 92.2 टक्के, निधी जैन 91.8 टक्के, हर्षल सानप 91.7 टक्के, श्रेयश घुगे 91.3 टक्के, अनुश्री पांडे 91.07 टक्के, भाविन मेहता 90.7 टक्के यांनी मेरीटमध्ये स्थान मिळविले. सोबतच 22 विद्यार्थ्यांनी 80 टक्केपेक्षा अधिक गुण संपादन केले. शाळेचे संस्थापक संजय तुलशान आणि अल्पा तुलशान, मुख्याध्यापिका श्वेता तिवारी यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आरडीजी पब्लिक स्कूलच्या पहिल्या बॅचचे यश

 10 वी सीबीएससी परीक्षेत आरडीजी पब्लिक स्कूल पहिल्याच वर्षीचा निकाल शंभर टक्के लागला असून 84  टक्के विद्यार्थी प्रावीण्यासह पास झाले. यामध्ये नेहा श्रावण इंगळे हिने 98.67 टक्के घेत प्रथम क्रमांक पटकावला. तर संस्कृती सतीश देशमुख 97.17 आणि आदिती रवी अग्रवाल 97 टक्के घेत अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानावर राहिले. 11 विद्यार्थ्यांनी 90 टक्केपेक्षा जास्त तर 2 विद्यार्थ्यांनी 95 पेक्षा जास्त मार्क मिळवले. नेहा श्रावण इंगळे हिने गणित, संस्कृत, विज्ञान आणि संगणक या विषयांमध्ये शंभर पैकी शंभर गुण प्राप्त केले. हर्ष टावर या विद्यार्थ्याने सुद्धा संस्कृतमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवले. सामाजिक शास्त्रामध्ये 4 विद्यार्थ्यांनी सर्वाधिक 95 गुण मिळविले. हिंदीमध्ये 96 गुण सिद्धीमा शर्मा हिने मिळवले. मराठीमध्ये संस्कृती देशमुख हिने सर्वाधिक 98 गुण मिळविले. निकालांमध्ये मुलींनी बाजी मारली. यावेळी आरडीजी पब्लिक स्कूलचे अध्यक्ष दिलीपराज गोयंका, प्राचार्य डॉ. उषा वानखेडे आणि उपप्राचार्य श्वेता चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

जवाहर नवोदयचे 10 विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत

जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता 10 वीच्या एकूण 78 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. निकालात शाळेने 100 टक्के यश संपादन केले आहे. यामध्ये दहा विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत आले. 98 टक्के गुणांसह निकिता बंड हिने शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला. नितीन भांबरे 95.20, ईश्वर पोटे 94.60, प्रणव बेलोकर 93.40, खुशी वाडेकर 93 टक्के, राजेंद्र कदम 92.40, संवादकर 91.60 टक्के, ऋषभ ढोलास 91.60, गायत्री रेखाते 91.60 टक्के प्राप्त केले. या यशासाठी प्राचार्य सुमन बैलमारे यांनी सर्व शिक्षकांनाही शुभेच्छा दिल्या.

पोदार इंटरनॅशनल स्कूलची भरारी

पोदार इंटरनॅशनल स्कूलने परंपरेनुसार या वर्षीसुद्धा 100 टक्के निकाल देऊन नावलौकिक प्राप्त केले आहे. लक्षिता संतानी हिने 98.60 गुण मिळवत शाळेतून अव्वल स्थान पटकावले आहे. याशिवाय एकूण 112 विद्यार्थ्यांमधून 36 विद्यार्थी 90 टक्केपेक्षा जास्त टक्के घेऊन पास झाले आहेत. 71 विद्यार्थी 71 ते 89 टक्के गुण घेऊन पास झाले आहेत तर केवळ 5 विद्यार्थी 61 ते 70 टक्क्यांच्या दरम्यान पास झालेत. विद्यार्थ्यांनी विविध विषयांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवून शाळेच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे. गणित विषयात एकूण 3 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळविले आहेत. यात लक्षिता संतानी, वेदांत तायडे आणि जय मोटवानी यांचा समावेश आहे. विज्ञान विषयात एकूण 3 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत. यात वेदांत तायडे, स्वराज वाघ आणि संजीवनी उंदीरवाडे यांचा समावेश आहे. सामाजिकशास्त्रात वेदांत तायडे, कुलदीप ठाकरे, साची मानधने, प्रियांका चौधरी, विदुषी पंडित यांनी यश मिळवले.  यशाबद्दल शाळेच्या प्राचार्या नीता तलरेजा व शिक्षकगण तसेच शाळेचे प्रशासकीय अधिकारी चेतन सोने यांनी कौतुक केले आहे.

ज्युबली इंग्लिश हायस्कूलचा 76.4 टक्के निकाल

सीबीएसई 10वीच्या परीक्षेत ज्युबिली इंग्लिश हायस्कूल कुंभारी शाळेतील एकूण 43 विद्यार्थी प्रविष्ट झाले. यापैकी प्रावीण्य श्रेणीत लावण्या पिंजरकर हिने 96 टक्के गुण घेत प्रथम येण्याचा मान पटकावला. याशिवाय द्वितीय क्रमांक प्राची वाघमारे 95.8 टक्के तर मानसी साठे हिने 95.4 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. प्रणव जोशी 94.6, शिवांगी देशपांडे 94.2, खुशी राऊत 93.8 तसेच गायत्री पांडे 93.2 टक्के प्राप्त केले. या सर्व विद्यार्थ्यांचे अकोला एज्युकेशन सोसायटीच्या संचालक मंडळाने व शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.