गडचिरोलीत ७२ एसआरपीएफ जवानांना कोरोनाची लागण

गडचिरोली, 

गडचिरोलीत ७२ एसआरपीएफ जवानांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे जवान संस्थात्मक विकागीकरणात होते. त्याशिवाय पोलिस विभागातून मुंबईहून परतलेला एंखी एक व्यक्ती आज कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. यामुळे आज एकूण ७३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, आज गडचिरोली जिल्ह्यातील ४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तसेच, जिल्ह्यातील एकूण ११३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या सक्रिय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या १६५ आहे. तसेच, जिल्ह्याबाहेरील आतापर्यंत आढळलेले व जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ५१ आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३३० झाली आहे.

जिह्याची सध्याची कोरोना स्थिती पुढील प्रमाणे आहे 

  • आजचे कोरोना बाधित – 73
  • आज कोरोनामुक्त-04
  • जिल्हयातील एकूण कोरोनामुक्त – 113
  • सद्या सक्रिय कोरोना बाधित- 165
  • मृत्यू – 01
  • एकुण बाधित – 279