नागपुरात ३४ कोरोनामुक्त, १७ जण नव्याने बाधित

  • सक्रिय कोरोना बाधितांची आकडेवारी ९९

नागपुरात ३४ कोरोनामुक्त, १७ जण नव्याने बाधित

नागपूर.  कोरोनाचा दंश झेलणाऱ्या नागपूर जिल्ह्यात रविवारी ३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले.  नवीन कोरोना बाधित रुग्णांची संख्या १७ इतकी असल्याची माहिती संबंधित प्रशासनाने दिली. जिल्ह्यातील सक्रिय कोरोना बाधितांची आकडेवारी सध्या ९९ इतकी झाली आहे.

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये गडचिरोली १, अहेरी ८, आरमोरी १, सिरोंचा १, कोरची १, धानोरा २० पोलीस आणि २ स्थानिक अशा एकूण २२ जणांचा समावेश आहे. तर नवीन १७ बाधितांमध्ये चामोर्शी तालुक्यातील १० जण आहेत. यामध्ये चंद्रपूर येथे रुग्णालयात भरती असलेला १ रुग्ण, ३ जण प्रतिबंधात्मक क्षेत्रातील रुग्णाच्या संपर्कात आलेले, १ जण गडचिरोली येथील रुग्णांच्या संपर्कातील आणि त्याची मुलगी बाधित आढळून आहे. चामोर्शी ग्रामीण रुग्णालयातील ४ रुग्णांना धरून चामोर्शी मधील १० जण बाधित मिळाले. आरमोरी मधील गोंदियावरून आलेला १ जण, अहेरी तालुक्यातील ३ जण आहेत. यामध्ये रुग्णाच्या संपर्कातील २ आणि आन्ध्रवरून आलेला १ जण, गडचिरोली सामान्य रुग्णालयातील रुग्णांना सेवा देणारे ३ जण बाधित असल्याचे आढळून आले आहे. अशा प्रकारे आज नवीन १७ बाधित आढळून आले. यामुळे जिल्हयातील एकूण कोरोना बाधित ८८९ झाले, कोरोनामुक्त ७८९, तर सध्या सक्रिय ९९ राहिले आहेत.