child marriage

चंद्रपूर. लॉकडाऊन काळामध्ये बालविवाह होत आहे.  तसेच घरातून बालकांचे  पळून  जाण्याचे प्रकारही वाढले आहेत.  आजच्या तांत्रिक युगात बालकांवर स्मार्टफोनचा झालेला परिणाम तसेच एकमेकांना मॅसेजेस करणे, प्रेम प्रकरण प्रस्थापित करणे असे प्रकार शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत. अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांना पळवून नेणे व त्यांच्यासोबत संबंध प्रस्थापित करणे असे प्रकार वाढले आहेत.

शहरी किंवा ग्रामीण भागात बालविवाह, बालकांवर होणारे अत्याचार, बालकामगार, फुस लावून पळवून नेणे, अनैतिक व्यापार अशा घटना घडत आहेत. बालकांसंबंधी असे प्रकार घडू नये, म्हणून गाव पातळीवर बाल ग्राम संरक्षण समितीत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका, तसेच ताळुका पातळीवर तालुका बाल संरक्षण समितीत, तहसीलदार एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण), आणि जिल्हा पातळीवर जिल्हा बाल संरक्षण समितीमध्ये अध्यक्ष जिल्हाधिकारी व पोलिस विभाग, अध्यक्ष बालकल्याण समिती, जिल्हा महिला बालविकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व प्रभाग बाल संरक्षण समिती अध्यक्ष नगरसेवक, अंगणवाडी शिक्षिका आणि इतर बालकांशी निगडीत कार्य करणार्‍या शासकीय यंत्रणा तसेच गाव पातळीवर बालविवाह प्रतिबंध अधिकारी (ग्रामसेवक) त्यांची सहायक अंगणवाडी सेविका, बालविवाह व बालकांवर होणारे अत्याचारासंदर्भात समिती नेमण्यात आली आहे.