कोरोनाच्या संक्रमणामुळे घरात मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ ; आई व मुलीचा मृतदेह आढळला कुजलेलया अवस्थेत

मुलगी सुरेखा पाचखंडे ही गेल्या काही दिवसांपासून आजारीच होती. काही दिवसांपूर्वी तिला हिंगणघाट येथील रुग्णालयातून आणण्यात आले होते. पण त्यानंतर दोघीही घराबाहेर पडल्याच नसल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली आहे. रविवारी परिसरात दुर्गंधी पसरल्याचे लक्षात येताच घरात जाऊन पाहिले असता दोघांचंही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले.

    वर्धा:कोरोनामुळे वडील आणि मुलगा याचा घरातच मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच समुद्रपूर तालुक्यातील सावंगी येथे घरातच आई आणि मुलगीचा कुजलेल्या अवस्थेत सापडाल्याची  धक्कादायक घटना घडली आहे. या दोघांचीही शासकीय रुग्णालयात कोरोना चाचणी केली असता दोघींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सुभद्रा डोमाजी मांडवकर (८०) व सुरेखा हरिश्चंद्र पाचखंडे (४५) अशी मृतांची नावे आहे.

    मुलगी सुरेखा पाचखंडे ही गेल्या काही दिवसांपासून आजारीच होती. काही दिवसांपूर्वी तिला हिंगणघाट येथील रुग्णालयातून आणण्यात आले होते. पण त्यानंतर दोघीही घराबाहेर पडल्याच नसल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली आहे. रविवारी परिसरात दुर्गंधी पसरल्याचे लक्षात येताच घरात जाऊन पाहिले असता दोघांचंही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले.

    जिल्हयात सध्या कोरोनाबधितांचा आणि मृतकांचा आकडा वाढत आहे. अशातच अनेक रुग्ण तपासणी न करता घरीच राहत आहे. आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने अनेकांचा घरीच मृत्यू होत आहे.