प्रकाश वाघमारे
प्रकाश वाघमारे

  • प्रकाश वाघमारे यांचा आरोप
  • पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह (?)

वर्धा. (श्या. पंत.).  (Wardha)  जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या तळेगाव (Talegaon) येथील पोलिस ठाण्याचे ठाणेदार रवी राठोड यांचे गावातील राजकीय नेते आणि दारूच्या व्यावसायिकांशी सलोख्याचे संबंध आहे. यामुळे आपल्या ट्रकमधील मालाच्या अफरातफरी प्रकरणाची चौकशी होत नाही, असे घनागती आरोप प्रकाश वाघमारे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.

जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या तळेगांव येथील प्रकाश वाघमारे यांनी भाडेतत्त्वावर घेतलेल्या ट्रकमध्ये माल भरून तो झारखंडला पाठविला. मात्र, ट्रकवर असलेल्या चालक (Truck Driver) आणि क्लिनरने (cleaner) संगनमत करून तब्बल ८९ हजार रुपयांची अफरातफर केली. याप्रकरणी तक्रारदार वाघमारे यांनी तळेगांव पोलिसांना तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सात दिवस तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. अखेर वाघमारे यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे यासाठी अर्ज केला. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या आदेशावरून तळेगांव पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आणि आरोपींना अटकही केली. न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

यादरम्यान प्रकाश वाघमारे (Prakash Waghmare) यांनी पोलिसांना या दोन आरोपींसोबत अजून एक मास्टर माईंड असल्याचे आपल्या बयानात सांगितले व त्याबाबत आपल्याकडे पुरावा असल्याचे सुद्धा सांगितल्यावरही पोलिसांनी त्या तिसऱ्या आरोपीबाबत साधी चौकशीसुद्धा केली नसल्याने तळेगांव पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत असा प्रश्न प्रकाश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
तक्रारदारालाच आरोपी बनवून त्याच्यावर गुन्हा नोंदविला.

तळेगाव पोलिसांची अजब कार्यपद्धती
तळेगाव पोलिसांनी ट्रकमधील माल चोरीला गेल्याप्रकरणी तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा पारदर्शी पद्धतीने तपास करणे अपेक्षित होते. मात्र, या घटनेत तक्रारदार वाघमारे यांना पोलिसांच्या उलट्या कार्यपद्धतीचा प्रत्यय आला. तो म्हणजे, पोलिसांनी चोराला पकडण्याऐवजी वाघमारे यांच्यावरच कलम ३२४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे; याउलट यातील मास्टर माईंडच्या विरोधात साक्षीदार, पुरावे असतानासुद्धा सलग सात दिवस ठाणेदार रवी राठोड यांनी दखल न घेतल्याने फिर्यादी वाघमारे यांना वरिष्ठांकडे जाऊन घटनेची तक्रार दाखल करून घ्यावी लागली.

यामुळे तळेगांवचे ठाणेदार व यातील मास्टर माईंड यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच यातील मास्टर माईंड वर सुद्धा चोरीचा माल विकत घेऊन अफरातफर करण्याबाबतचे गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा येत्या आठ दिवसानंतर पोलीस अधीक्षक वर्धा यांच्या दालनात न्याय भेटेपर्यंत ठिया करण्यात येईल असा इशारा प्रकाश वाघमारे यांनी दिला आहे.