विदेशी दारूसह लाखोंचा माल जप्त

  • एका आरोपीला अटक

चंद्रपूर. जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी असताना, वेगवेगळ्या युक्त्या लढवून दारूची तस्करी करण्यात येत आहे. मात्र सजग पोलिसांकडून या सर्व प्रकारांना वेळीच पायबंध घालण्यात येत आहे. अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. चिमूर पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे दारू तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला. पोलीस खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करत असताना एक पांढऱ्या रंगाची मारुती अल्टो कार MH 34 AM 4361 चिमुरला जाताना दिसली. पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर कार चालकाने कार सोडून पळ काढला. कारची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात विदेशी दारू आढळली. या प्रकरणी पोलिसांनी श्यामराव मुरलेली उर्फ श्यामराव मुळे  याला अटक केली असून ३ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.