मोबाईल चोरास अटक

हिंगणघाट,

स्थानिक नंदोरी रोडवरील एका घरुन 6 मोबाईल चोरी करण्यात आले होते. याप्रकरणी शहरातील गोमाजी वॉर्ड येथील आरोपी शेख जाबीर शेख कादर (23) यास हिंगणघाट पोलिसांनी अटक केली आहे. सदर गुन्ह्यातील चोरलेले 4 मोबाईल संचसुध्दा जप्त करण्यात आले .

   तामीळनाडू राज्यातील कन्याकुमारी येथील जिपिंग जिशो दंगराज हे हिंगणघाट येथील संत तुकडोजी वॉर्ड साईमंदिर परिसरात राहतात. त्यांच्या घरून पहाटेच्यावेळी अज्ञात इसमाने सहा मोबाईल चोरून नेल्याची घटना 4 मार्च रोजी घडली होती.

तपास करीत असताना पोलिसांनी शेख जाबिर शेख कादर यास सोमवारी मुद्देमालासह ताब्यात घेतले. आरोपीने गुन्ह्याची कबुली देऊन चोरलेले मोबाईल संच नातेवाईकांकडे दिल्याची माहिती दिली. परंतु, यातील 2 मोबाईल अजूनही मिळाले नसून नातेवाईकांना ताब्यात घेतले किंवा नाही, याबद्दल माहिती मिळाली नाही.

 जप्त मुद्देमालात 2 रियलमी, 1 रेडमी आणि 1 मोटो कंपनीच्या मोबाईल संचाचा समावेश आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस  निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील गजानन काळे, सुहास चांदोरे, गजानन कामठाणे, गजेंद्र धर्मे, उमाकांत लडके, उमेश बेले हे करीत आहे.