covid center in nagpur

नागपूर. एकीकडे कोरोनाचे संक्रमण झपाट्याने पसरत आहे. तर दुसरीकडे उपचारासाठी लोकांमध्ये अफरातफरीचे वातावरण आहे. लक्षणे दिसत असतानाही लोकं होम आयसोलेशनचा पर्याय निवडत आहे. त्यानंतर घरीच उपचारादरम्यान प्रकृती गंभीर झाल्यास खासगी हॉस्पिटलमध्ये भरती होण्यासाठी भटकत आहे. प्रशासनाने तयार  केलेल्या ३ कोविड केअर सेंटरमध्ये (covid care center) निम्म्यापेक्षा अधिक बेड रिकामे (more then half bed) पडून आहे. लोकं शासकीय सुविधांचा लाभ घेण्याऐवजी विनाकारण त्रास सहन करीत आहे. प्रशासनाने जेव्हापासून होम आयसोलेशनचा पर्याय दिला आहे. तेव्हापासून लक्षणे कमी असलेले आणि लक्षणे नसलेले अधिकाधिक लोकं घरीच उपचाराला प्राधान्य देत आहे.

आतापर्यंत होम आयसोलेशनमध्ये असलेले २४०८५ लोकं बरे झाले आहे. तसेच मंगळवारपर्यंत शहरात ज्या ११३४४ ऑक्टिव्ह केसेस होत्या त्यापैकी ५७५७ लोकं होम आयसोलेशनमध्ये आहे. होम आयसोलेशन अशा लोकांसाठी योग्य आहे, ज्यांच्या घरी पुरेशी जागा आहे. सोबतच उपचाराची सर्व साधन व सामुग्री आहे. परंतु अनेक लोकं हॉस्पिटलमध्ये जाण्यास घाबरत असल्यामुळे होम आयसोलेशनचा पर्याय निवडत आहे. परंतु तोपर्यंत प्रकृती गंभीर होत असल्यामुळे त्यांना भरती करण्यास खासगी रुग्णालयांतर्फे नकार देण्यात येत आहे. ही स्थिती शहरात सामान्य झाली आहे.

निम्यापेक्षा अधिक बेड रिकामेच
सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे आमदार निवासात कोविड केअर सेंटर बनविण्यात आले आहे. येथे ३७५ बेड्सची व्यवस्था आहे. तसेच मनपातर्फे तयार केलेल्या व्हीएनआयटीमध्ये ४१५ पेक्षा अधिक आणि पाचपावली कोविड सेंटरमध्ये सुमारे ३०० बेड्स उपलब्ध आहे. मंगळवारपर्यंत आमदार निवासात १५०, व्हीएनआयटीमध्ये ६० आणि 'पाचपावलीमध्ये सुमारे १०० रुग्ण भरती होते. तिन्ही सेंटरमध्ये ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था आहे. सकाळी व सायंकाळी दोन्ही वेळेत डॉक्टर व नर्सेसचा राऊंड होतो. याशिवाय दिवसभर रक्‍त व ऑक्सिजनची तपासणी आणि तापमान तपासले जाते. सकाळी-सायंकाळी नाश्त्याशिवाय भोजनही मिळते. चोवीस तास डॉक्टरांची सुविधा उपलब्ध आहे. आंघोळीसाठी गरम पाणीही मिळते. रुग्णांच्या मनोरंजनासाठी टीव्हीसुद्धा उपलब्ध आहे. एवढेच नाही तर कोणत्याही रुग्णाची प्रकृती बिघडल्यास तत्काळ रुग्णवाहिकेच्या मदतीने त्याला मेडिकल व मेयोमध्ये भरती करता येते. सेंटरमधील रुग्णांना मेयो व मेडिकलमध्ये भरती करण्यास प्राधान्य देण्यात येते. सर्व प्रकारच्या सुविधा असतानाही पॉझिटिव्ह रुग्ण या केंद्रांमध्ये भरती होण्याऐवजी भटकत आहे, ही बाब न समजण्यापलिकडे आहे.