खासदार नवनीत राणा यांची प्रकृती खालावली, उपचारासाठी मुंबईकडे रवाना

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना श्वास घेण्यास त्रास  होत असून त्यांची प्रकृती  खालावल्याने त्यांच्यावर आता मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. यासाठी त्या मुंबईला रवाना झाल्या आहेत. सध्या त्यांच्यावर नागपूरच्या वोक्हार्ट रुग्णालयात उपचार सुरु होते.नवनीत राणांना ६ ऑगस्टला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर सुरुवातीला अमरावती येथे उपचार सुरु होते मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना नागपूरच्या वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  आज (गुरुवारी) त्यांना शवसनाचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राणा यांच्या कुटुंबातील ७ते ८ जणांना कोरोनाची लागण झाली आहेत यात  रवी राणा यांचे वडील, आई, बहीण, बहिणीचे पती, भाचा, पुतण्या यांच्या सह खासदार राणा यांची मुलगी आणि मुलगाही कोरोनाबाधित आहेत.