क्षुल्लक कारणातून युवकाची हत्या

आमगाव. तालुक्यातील माल्ही येथे पोळ्याच्या दिवशी रात्री क्षुल्लक कारणातून युवकाची हत्या करण्यात आली. मृत युवकाचे नाव आतीष बाळकृष्ण पाथोडे(वय २५, रा श्रीरामटोली) असे आहे.

सविस्तर असे की, पोळ्याच्या दिवशी माल्ही नजिकच्या श्रीरामटोली येथील आतिष पाथोडे याचे गावातीलच रतोने कुटुंबाशी क्षुल्लक कारणातून वाद झाला. रतोने कुटुंबीयांनी या वादातून आतिषला लाठ्या आणि काठ्यांनी मारहाण केली. यात आतिष गंभीररित्या जखमी झाला. त्याला जखमी अ‌वस्थेत आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आमगाव पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.