मंदिरे उघडा अन्यथा कायदा हातात घेऊ : विजयराज शिंदे

बुलडाणा. धार्मिक प्रार्थनास्थळे, मंदिरे सुरू करण्याच्या मागणीसाठी २९ ऑगस्ट रोजी येथे माजी आमदार विजयराज शिंदे (vijayraj shinde) यांच्या उपस्थितीत कारंजा चौकातील दुर्गादेवी मंदिर व चिखली रोड वरील जगदंबा माता मंदिर येथे पूजा करून भाजपाच्या वतीने घंटानाद आंदोलन (ghantanad agitation) करण्यात आले.

प्रार्थना स्थळे, मंदिरे सुरू न केल्यास मंदिराची कुलूप तोडून कायदा हातात घेऊ असा इशारा विजयराज शिंदे यांनी दिला. शिंदे म्हणाले, तुम्ही दारूची दुकान, मांसाची दुकाने, मॉल उघडताय, सगळ्या गोष्टी उघडत आहात. मात्र मंदिरे का बंद ठेवली. मंदिरे उघडली तर कोरोना वाढणार नाही. या सरकारने मंदिर बंद ठेवून आमच्या मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आणली आहे. घंटानादाने झोपी गेलेल्या राज्य सरकारला जागे करण्याचा हेतू आहे.