फेरीवाले बनू शकतात कोरोनाचे वाहक

गावात मुक्त संचार

तिवसा,

कोरोनाचा प्रसार दिवसागणिक वाढत आहे. आता ग्रामीण भागापर्यंत कोरोनाचे संक्रमण पोहोचले आहे. असे असताना बाहेर गावातून येणारे फेरीवाले चिंतेचा विषय ठरत आहेत. गावातील फेरीवाले कोरोना विषाणूचे वाहक बनण्याची भीती निर्माण झाली आहे. ग्रामपंचयत गुरुदेवनगर(गुरुकुंज) प्रशासनाचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष असल्याने कोरोनाचे यामुळे कोरोनाचे संकट अधिकच गडद होताना दिसत आहेत.

गुरुदेवनगर ग्रामपंचयतवर प्रशासक असून ग्रामसेवक (सचिव) सातरगाव, डेहणी या तीन ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांचे ग्राम व्यवस्थापणाकडे पुर्णत: दुर्लक्ष होत आहे. कोरोनाला आळा घालण्याचा हेतूने जिल्हा प्रशासन अहोरात्र प्रयत्न करित आहे. मात्र ग्रामीण जनता नियमाचे शासनाच्या उपाययोजनांना हरताळ फासत आहेत. जनतेकडून कर्फ्यूचे किंवा दैनंदिन वेळेचे पालन केल्या जात नाही. तिवसा, नांदगाव पेठ, अमरावती येथून दररोज भंगार व्यावसायिक, फळ विक्रेते, बेडशीट-कापड विक्रेते पहाटेपासूनच गावात दाखल होत आहेत. गुरुदेव नगरात सद्यास्थितीला कोरोनाचा शिरकाव झाला नसला तरी  रेडझोनमधील वरील तिन्ही गावात कोरोना रुग्ण आढळून आले असल्याने, येथून येणार्या फेरीवाल्यांना तूर्तास गावबंदी करावी अशी मागणी गावकर्यांकडून केल्या जात आहे.