कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करावे

  • कृषी अधिका-यांचे शेतक-यांना निर्देश

बुलढाणा . गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन कृषी अधिका-यांनी शेतक-यांना केले आहे. बोंड अळीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन उपाय योजना केल्यास नुकसान पातळी कमी राहू शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.  जिनिंग मिल आणि मार्केट यार्डमध्ये कच्च्या कापसाची साठवणूक केल्यामुळे गुलाबी बोंडअळी पोसली जाते. त्यामुळे कापसाची विल्हेवाट त्वरित लावणे योग्य ठरते. गुलाबी बोंडअळीला निरंतर खाद्य पुरवठा होणार नाही या बाबत सतर्क राहावे. गैर बीटी कपाशीची (रेफुजी) आश्रय पीक म्हणून वापर न करणे. वेळेवर आणि योग्य व्यवस्थापनाचा अभाव ही प्रमुख कारणे राहू शकतात. त्यामुळे कापूस पिकाचा हंगाम डिसेंबर ते जानेवारी दरम्यान संपुष्टात आणावा, अर्धवट उमललेली प्रादुर्भावग्रस्त बोंडे व पिकांचे अवशेष नष्ट करावे. गुलाबी बोंडअळीने प्रादृर्भावग्रस्त कापसाची गोदामाध्ये साठवण करु नये. बीटी कापूस अथवा सरळ वाणांची वेळेतच म्हणजे जून महिन्यात पेरणी करावी.

पतंगाच्या हालचालीवर लक्ष्य ठेवण्यासाठी पेरणीच्या ४५ दिवसानंतर हेक्टरी ५ याप्रमाणे कामगंध सापळे लावावेत. कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीच्य प्रादुर्भावाचे निदान करण्यासाठी पात्या व फुले लागण्याच्या अवस्थेत वेळोवळी निरीक्षण करावे. ज्या ठिकाणी उपलब्धता असेल तिथे ट्रायकोग्रामा बॅक्ट्रीया अंडयावर उपजिविका करणारा परोपजिवी मित्र किटक ६०,००० एकर या प्रमाणे एका आठवडयाच्या अंतराने कपाशीचा फुलोरा अवस्थेत तिनदा प्रसारण केल्यास चांगले नियंत्रण मिळते. लागवडीच्या ६० दिवसानंतर निंबोळी अर्क ५ टक्के निम तेल ५ मिली प्रती लिटरची फवारणी करावी. मान्यता असलेल्या व शिफारस केलेल्या किटनाशकाची फवारणी (लेबल क्लेम) प्रमाणे करावी. जहाल विषारी व उच्च विषारी किटनाशकाची फवारणी टाळावी, असे आवाहनही उपविभागीय कृषी अधिकारी डाबरे यांनी केले आहे.