पोलिस कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात

वाशीम,

बंदोबस्तात तैनाद असलेले पोलिस कर्मचारी मोठ्याप्रमात कोरोनाच्या विळख्यात अडकत असल्याचे समोर आले आहे. वाशीम जिल्ह्यातील एकूण 10 पोलिस कर्मचारी कोरोना बाधित आढळले आहेत. मात्र हे पोलिस कर्मचारी कुणाच्या संपर्कात आल्याने संक्रमीत झाले याची नेमकी माहिती उपलबध होत नसल्याने जिल्ह्यात समूह संक्रमणाचा धोका संभवत आहे. सदर पोलिस कर्मचारी कारवाई दरम्यान अनेक लोकांच्या संपर्कात आले आहेत.

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, 17 जुलै रोजी रात्री उशिरा प्राप्त अहवालात 23 व्यक्ती कोरोना बाधित आढळल्याने एकच खळबळ उडाली. जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची संख्या 340 झाली आहे. त्यामध्ये क्रियाशील रुग्ण 197 असून, 135 रुग्णांना सुटी देण्यात आली तर 8 जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कारंजा, मंगरुळनाथ व मालेगाव पोलिस स्टेशनचे 10 कर्मचारी बाधित असल्याचे निष्पन्न झाले. बाधित पोलिस कर्मचारी कुणाच्या संपर्कात आल्याने संक्रमीत झाले याची नेमकी माहिती उपलबध होत नसल्याने जिल्ह्यात समूह संक्रमणाचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अधिक सजग होण्याची गरज आहे.
 
 
जिल्ह्यात 15 जुलै पासून लोकडाऊनच्या नियमात बदल करण्यात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलिस कारवाई केल्या जात आहेत. काही ठिकाणी कारवाई करण्यासाठी बाहेरील पोलिस ठाण्यातून अतिरिक्त कुमुक सुद्धा मागविण्यात आली आहे. कारंजा शहरातही गेल्या चार दिवसात मोठ्या प्रमाणात वाहनांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. या कारवाईत सहभागी असलेले वाहतूक नियंत्रण विभागाचे कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.