वरोऱ्यात पोलिसांची जुगारावर धाड

1 लाख 21 हजाराचा माल जप्त, 9 जणांना अटक

वरोरा. शहरातील सुभाष वॉर्ड मध्ये एका घरी जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. माहितीनुसार वरोरा पोलिसांनी सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकली. कार्यवाहीत एकूण रोख 49180 रुपये, 52 ताश पत्ते, 8 मोबाईल, अंदाजे किंमत 72000 असा एकूण 1 लाख 21 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून, एक आरोपी फरार आहे. महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार कलम 4 , 5  नुसार आरोपींवर कार्यवाही करण्यात आली. ही कारवाई सोमवारी सायंकाळी 6.30 च्या दरम्यान करण्यात आली.

शहरातील सुभाष वॉर्ड येथील रहिवासी नुतेश महादेव कुंभारे यांच्या घरी जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जुगारावर धाड टाकण्यात आली.

घटनास्थळी 52 ताश पत्ते, 8 मोबाईल व इतर रोख रक्कम असा एकूण 1 लाख 21 हजार 180 रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार खेळणारे आरोपी दाऊद खान रहीम खा पठाण 32, रा.सुभाष वॉर्ड, आकाश नारायण पराते 31, रा. साई नगर सुभाष वॉर्ड, अरशद शोएब मलिक 48, रा.कटारिया ले आऊट सुभाष वॉर्ड, संजय वामनराव कुंभारे 48, रा.सुभाष वॉर्ड, दिलीप वसंत निमजे 50, रा.आशिर्वाद मंगल कार्यालयाजवळ सुभाष वॉर्ड, सुभाष राजेश्वर कुंभारे 46, रा. कटारिया मंगल कार्यालयाजवळ सुभाष वॉर्ड, अशफाक शरीफ शेख 40, रा.सुभाष वॉर्ड, अनिल वसंतराव कुंभारे 53, रा.कटारिया ले आऊट, सुभाष वॉर्ड, मोरेश्वर गजानन व्यापारी 42, रा.पावडे ले आऊट बोर्डा ता.वरोरा,नुतेश महादेव कुंभारे वय 45,रा.काजी मसदीतचे बाजूला सुभाष वॉर्ड रा. सर्व वरोरा. असे 10 आरोपी असून, नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून, एक आरोपी नुतेश कुंभारे फरार झाला आहे. पुढील तपास वरोरा पोलिस करीत आहे.