खल्लार रस्त्याची दैनावस्था, गावकरी त्रस्त

पावसाळ्यात तारेवरचीच कसरत

दर्यापूर,

तालुक्यातील हयापूर ते खल्लार या दोन्ही गावातील मुख्य रस्त्याची दैनावस्था डोकेदुखी ठरली आहे. हा रस्ता माती व दगडाचा असल्यामुळे पावसाळ्यात येथे चिखल होतो. या रस्त्याने गावकऱ्यांची अधिक वर्दळ असल्यामुळे तारेवरची कसरत करीत मार्ग काढावा लागतो. पावसाळ्यात तर हा रस्ता आणखी त्रासदायक ठरत आहे. शेतात मशागतीसाठी बैलजोडी, ट्रॅक्टर नेताना अनेकवेळा ते चिखलात फसतात.

या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग, तालुक्यातील आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांनी लक्ष दिले नाही. या रस्त्याचे डांबरीकरण करून पक्का रस्ता करावा, अशी मागणी हयापूर येथील स्वप्निल गोरडे, अनुज गोरडे, मधुकर गोरडे, भूषण गोरडे, अवधूत निंगोत, सचिन पंडित, कपिल ढोके, राजेंद्र गवई, राजेंद्र भारसाकळे, अक्षय पंडित, रवी भारसाकळे, बाबुराव पंडित, नंदू गोरडे, बबन गोरडे, सतीश भारसाकळे, लक्ष्मण भारसाकळे, विलास भारसाकळे यांनी केली आहे.