सहायक पोलिस उपनिरीक्षक विजय खर्चे यांना राष्ट्रपती पदक

अकोला. शहर कोतवाली पोलिस स्टेशनमधील सहायक पोलिस उपनिरीक्षक विजय खर्चे यांना स्वतंत्रता दिनानिमित्त राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात येत आहे. खर्चे १९८८ साली पोलिस खात्यात रुजू झाले. विविध पोलिस स्टेशनला त्यांनी सेवा केली. मनमिळावू स्वभावाने त्यांनी छाप पाडली. २०१६ साली पोलिस महासंचालक डी. जी. इनसिगनिया यांच्याकडून त्यांना पदक मिळाले होते. मलकापूर तालुक्यातील वडजी येथील मूळ रहिवासी असून त्यांची दोन्ही मुलं  उच्चविद्याविभूषित आहेत. आपल्या कामगिरीत पत्नी मंदा हिचा मोलाचा वाटा असल्याचे ते सांगतात.