दारू विक्रेत्या गुंडाविरुद्ध जनआक्रोश; दारू विक्रीतून एकावर चाकू हल्ला

वर्धा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या वडनेर गावात खुलेआम दारूविक्री सुरू आहे. वडनेर पोलिस प्रशासनाच्या खाबुगिरी धोरणामुळे कोणत्याही दारूविक्रेत्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे दारूविक्रेत्या गुंडांचे मनोबल वाढल्याने नागरिकावर चाकू हल्ला व तलवारी निघू लागल्या. याविरोधात जनआक्रोश निर्माण झाला आहे. याकडे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

हिंगणघाट : वर्धा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या वडनेर गावात खुलेआम दारूविक्री सुरू आहे. वडनेर पोलिस प्रशासनाच्या खाबुगिरी धोरणामुळे कोणत्याही दारूविक्रेत्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे दारूविक्रेत्या गुंडांचे मनोबल वाढल्याने नागरिकावर चाकू हल्ला व तलवारी निघू लागल्या. याविरोधात जनआक्रोश निर्माण झाला आहे. याकडे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

वडनेर येथीलच वार्ड क्रमांक ५ पाच येथील प्रणय डोफे हे २५ ऑगस्ट रोजी गावातील एका विक्रेत्याकडे दारू पिण्यास गेले होते. दारू पिवुन परत जात असतांना दारूविक्रेता कालुसिंग जुनी तिथे आला. प्रणय डोफे याला तू माझ्या कडील दारू विकत का घेतली नाही ? म्हणून त्याच्यावर चाकू हल्ला करून प्रणय डोफे याला गंभीर जखमी केले. याबाबत आरोपी कालुसिंग जुनी याचेवर डोफे यांच्या तक्रारीवरून वडनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार झाला असून वडनेर पोलिस त्याचा शोध घेत आहे. या प्रकारामुळे तरुण पिढीमध्ये जनआक्रोश निर्माण झाला आहे. रात्री उशिरा बारा वाजेपर्यंत पोलिस ठाण्याला छावणीचे स्वरूप आले होते. या प्रकारामुळे वडनेरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा गुंडाविरुद्ध पोलिस प्रशासन काय कारवाई करतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नागरिकांच्या मनात दारूविक्रेत्या गुंड प्रवृत्तीच्या विरोधात जनआक्रोश उफाळून आला आहे. जनताचा त्यांना आता धडा शिकवेल अशी मागणी करणा-या हजारोच्या संतप्त जमावाने पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली होती. यामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी वडनेर गावातील दारूविक्री तत्काळ बंद करावी. गावातील शांतता आणि सुव्यवस्था कायम ठेवावी, अशी मागणी बुधवार २६ ऑगस्ट रोजी शेकडो तरुणांनी ठाणेदार गजभिये यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. यांसह आरोपीस तत्काळ अटक करण्याची मागणी केली. ग्रामपंचायत कार्यालयासह उपविभागीय पोलिस अधिकारी भीमराव टेळे यांनाही निवेदन देण्यात आले. पोलिस काय कारवाई करतात. याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.