This is the Bolero car that the sand smugglers parked horizontally on the main road in Buldhana district
रेती तस्करांनी मुख्य मार्गावर आडवी लावलेली हीच ती बोलेरो कार

  • बुलडाणा जिल्ह्यात तस्करांचे थेट प्रशासनालाच आव्हान
  • राज्यातील पोलिस प्रशासन रेती माफियांपुढे खुजे

बुलढाणा (Buldahana).  खडपूर्णा नदीतून अवैध वाळू उत्खनन करून प्रशासन आणि शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या रेती तस्करांना आवरणे प्रशासकीय अधिकाऱ्यांना कठीण जात आहे. कारण, हे तस्कर गुंडगिरी करत कर्तव्यावर असणाऱ्या अधिकाऱ्यांना भर रस्त्यात रोखयलाही मागेपुढे पाहत नसल्याची बाब पुढे येत आहे. अशीच एक घटना बुलढाणा जिल्ह्यातील अलीकडेच घडली. यामध्ये वाळूमाफियांनी अधिकाऱ्यांना धमविल्याचीही माहिती पुढे आली आहे.

नायब तहसीलदार विकास राणे व त्यांचे पथक डिग्रसमधील रेती घाट येथे वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी क्रमांक क्र. एमएच -२८ सी-६७६७ या वाहनातून जात होते; परंतु काही अंतर जात नाही तोच पांढऱ्या रंगाचे बोलेरो वाहन (क्रमांक एमएच -२८ व्ही-७८४४) रस्त्याच्या मध्यभागी उभी होती. ज्यामुळे अधिकारी कारवाईच्या ठिकाणी जाऊ शकले नाहीत. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात नायब तहसीलदार विकास राणे यांच्या फिर्यादीवरून सोनू मन्ते यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, या सर्व रेती तस्करांचे मंत्रालयापर्यंत लागेबांधे असल्याने त्यांचे कोणीही काहीच बिघडवू शकत नाही, या तोऱ्यात ते वागत असतात. त्यांना विरोध करणाऱ्याना ते जीवे संपविण्यासही मागेपुढे पाहत नसल्याचे अनेक प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. अशा स्थितीत राज्यातील पोलिस प्रशासन रेती माफियांपुढे खुजे ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.