वन विभागाच्या राखीव क्षेत्रात वाळू तस्करांचे थैमान

शेकडो ब्रास रेतीची तस्करी, पंचनामा फक्त 35 ब्रास रेतीचा
वन अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

कोरपना,

 गेल्या अनेक महिण्यापासून वनसडी वन परिक्षेत्रातील राखीव वन हद्दीत मांडवा बिटातील टांगारा व सावल हिरा कम्पारंमेंट न ७. मध्ये वाहता नाल्यातुन शेकडो ब्रास रेतीची तस्करी होत आहे. सोबतच  टि.पी नसताना सर्रास कोरपना शहरासह परिसरात कंत्राटदारामार्फत सिमेंट कॉंक्रिंट, रस्ता नाली बांधकाम, घरकुल लाभार्थी बांधकाम, कत्राटदार रेतीचा वापर करण्यात येत आहे. मात्र याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे संबंधित प्रकाराकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शेकडो ब्रासची रेती तस्करी होत असतांना पंचनामा फक्त 35 ब्रास रेतीचा झाल्या असल्याने याकडे वन अधिका-याचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

वन क्षेत्रात ठिकठिकाणी अवैध साठवणुक केलेले रेतीचे ढिग साचून आहे. सदर संपूर्ण प्रकार वन अधिका-यांच्या साटेलोटे असल्याने सर्रास सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. संबंधित कोलाम आदिवासींच्या शेताच्या पिकाची नासाड़ी तर केलीच मात्र राखीव वन क्षेत्रात सर्रास जेसीबीच्या सहाय्याने वुक्षाची वनजमिनीची नासघुस करीत रस्ता तयार करुण्यात आला आहे. अविरत रेती उपसा तस्करी होतांना वन विभागाच्या अधिका-यांचा निदर्शनास सदर प्रकार का आला नाही हा सवाल येथे उपस्थित होत आहे. १3 जुलैच्या मध्यरात्री पाच ट्रक्टर जेसीबीद्वारे रेती उपसा होत करित होते. दरम्यान उप संरक्षक यांच्या निर्देशावरून वन विभाग भरारी पथक संबंधित स्थळी पोहचण्याआधीच तस्कराना याबाबतीत सुबागा लागताच तस्कर यांत्रीक वाहनसह पसारा झाले. गेल्या अनेक दिवसा पासून शेकडो ब्रास रेती नाल्यातील बंधा-यातून रेती उपसा करुण लंपास केली असताना  फक्त 3५ ब्रास रेतीचा पंचनामा करण्यात आला. वन क्षेत्रात झालेल्या नुकसानीचे पिओआर करण्यास विलंब करण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या काळात रेती उपसा करण्याकरिता तस्कारांनी अक्षरश: थैमान घातले आहे. यावर कारवाई का करण्यात येत नाही आहे.

पूर्वी नदी घाटा वर रेती तस्करी करण्यात येत होती. मात्र रेती ट्रॅक्टरने झालेल्या अपघात एका आदिवासीचा मृत्यू झाल्याने व या वर तहसिदारामार्फत कारवाई करण्यात आल्याने तस्करांचा मोर्चा आता वनविभागाकडे वळला आहे. प्रहारचे सुरज ठाकरे यांनी मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे तर जनसत्याग्रह संघटनेचे आबीद अली यांनी उप वनसंरक्षक यांच्याकडे निष्पक्षपणे चौकशी करावी व दोषींवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे. संबंधित प्रकरणाकडे आता वनविभाग कोणती कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.