शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याप्रकरणी कर्नाटक सरकारचा निषेध

  • शिवसेनेच्या वतीने कर्नाटक सरकारविरोधी घोषणा

गोंदिया. कर्नाटक सरकार सीमाभागातील मराठी माणसांचा किती द्वेष करते, याचं आणखी एक संतापजनक उदाहरण समोर आले आहे. बेळगाल जिल्ह्यातील मनगुत्ती गावात तेथील नागरिकांनी बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारच्या आदेशावरून रातोरात हटवण्यात आल्याने शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

गोंदियातील यादव चौकात गोंदिया जिल्हा शिवसेनेच्यावतीने कर्नाटक सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. कर्नाटकमधील भाजप सरकारने शिवाजी महाराजांचा हटविलेल्या पुतळ्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे.या घटनेमुळे मनगुत्ती गावात तणाव निर्माण झाला आहे.आता महाराष्ट्रातही या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी निषेध नोंदवायाला सुरवात केली आहे.