धक्कादायक! सात वर्षाच्या चिमूकलीवर सामूहिक अत्याचार

 इंझाळा. माणुसकीला काळिमा फासणारी घटना वर्धा जिल्ह्यातील झंझाळा येथे समोर आली आहे. आईसोबत घराच्या समोर खाटेवर झोपली असताना ७ वर्षीय बालिकेला उचलुन बाजुला  असलेल्या नर्सरीत नेण्यात आले. आपल्या दोन सहका-यांसह सामुहिक अत्याचार करण्यात आला. विनोद विठ्ठल वरभे  (३५) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पुलगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात  आला आहे.

 इंझाळा येथील ७ वर्षीय बालिका आईसह खाटेवर झोपून होती. गावातीलच  आरोपी विनोद वरभे याने तिला उचलुन  नर्सरीत नेले. दोन सहका-यांसह  अत्याचार करीत परत आईजवळ आणुन सोडले. पीडिता रडत असल्याने तिला आईने विचारणा केल्यावर तिने हकीकत सांगितली. ही बाब सामाजिक संस्था चालविणा-या मंगेशी  मुन यांना माहिती झाली. तिने पीडितेचे समुपदेशन करीत पीडिता व तिच्या आईसह पुलगाव पोलिस ठाणे  गाठले. तक्रारीचे आधारे पोलिसांनी  गुन्हा दाखल केला. प्रकरणाची गंभीरता पाहता  वेगाने तपासाला सुरवात केली. उपविभागीय अधिकारी तुप्ती जाधव यांच्या मार्गदर्शनाता ठाणेदार रवींद्र गायकवाड, विवेक बन्सोड, रवींद्र हाडके,अनिल भोरे, मुकेश वादिले पुढील तपास करीत आहे.