बल्लारपूरमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार

  • एकाच मृत्यू
  • परिसरात तणाव

बल्लारपूर. शहरात दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बल्लारपूर बामणी मार्गावर जुन्या बस स्टॅन्ड जवळ दुचाकीस्वार हल्लेखोराने एका कार चालकावर गोळीबार केला. मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी ३ वाजता कार चालक सुरज बहुरिया बल्लारपूरवरून बामणीला जात होते. जिल्ह्यातले सर्वात मोठे औधोगिक क्षेत्र असलेल्या शहरात जुन्या बस स्टॅन्ड जवळ दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी सुरज बहुरिया यांच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी झालेले सुरज यांना रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून परिस्थिती नियंत्रणात आणत आहे. भरदिवसा झालेल्या या हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.