प्रियकरानंतर प्रेयसीचीही आत्महत्या

  • पिपरिया येथील घटना
  • शरीरसुखाच्या मागणीतून घडले प्रकरण

 

रामटेक,

शरीरसुखासाठी प्रेयसीने नकार दिल्याने प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केली़  तर प्रियकराच्या मृत्यूनंतर आठवडाभरातच तरुणीनेही राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना देवलापार पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या पिपरिया येथे नुकतीच घडली़. अतुल भोजराज कोहळे (22) रा़ पिपरिया व निकिता शेषराव गजबे अशी मृतक प्रेमीयुगुलाची नावे आहे़  9 जुलै रोजी अतुल याने नायलॉन दोरीने जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती़.  दिवसभर नवीन घराचे स्लॅप टाकण्याचे काम केले़  दरम्यान त्याने सायंकाळी दारू प्राशन केल्यानंतर संध्याकाळी 9 वा़ दरम्यान कुणाचा तरी फोन आल्यावरून घरून निघून गेला, व त्यानंतर परतलाच नाही़.  काही वेळाने त्याच्या मृत्यूची बातमी कुटुंबीयांना मिळाली़  याप्रकरणी देवलापार पोलिसांनी मर्ग नोंद केला होता़.  तपास करीत असताना गावातील निकिताशी त्याचे प्रेमसंबंध असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी तिच्याशी संपर्क केला़.  तिची प्रकृती बरी नसल्याने रामटेक येथील एका खासगी रुग्णालयात ती भरती असल्याचे समजले़,  त्यानंतर 15 जुलैला तिला सुटी मिळाली़ त्यानंतर पोलिसांनी तिला विचारपूस केली असता तिने अतुलशी प्रेमसंबंध असल्याचे कबुल केले़  8 जुलैपासून अतुल हा निकिताला शारीरिक संबंधाची मागणी करीत होता़ परंतु, आई-वडील व भाऊ घरी असल्याने ती बाहेर येऊ शकत नाही, असे तिने सांगितले व तिने शारीरिक संबंधाला नकार दिला़

अतुलने दिली होती आत्महत्येची धमकी
निकिताने नकार दिल्यानंतरही तो ऐकत नसल्याचे निकिताने पोलिसांना दिलेल्या बयाणात सांगितले होते़  9 जुलैला निकिताला सायंकाळी तो गावाशेजारील नाल्याजवळ भेटण्यासाठी बोलावत होता़  परंतु घरी सर्व जण असल्याने तिने भेटण्यासाठी नकार दिला़.  त्यानंतर रात्री 9 वाजताच्या दरम्यान निकिताला त्याने बरेच कॉल केले़  परंतु, घरी असल्याने फोन उचलू शकली नाही. 9.15ला   तिने फोन उचचला त्यावेळी देखील अतुलने निकिताला शारीरिक संबंधाची मागणी केली़  परंतु, तिने नकार दिल्याने त्याने तिला ‘मी आत्महत्या करेन’ असे म्हणून स्वत:च्या गळ्याला दोरी बांधताना व झाडाला दोरी बांधतानाचे फोटो काढून तिच्याकडे एंड्रॉईड मोबाईल नसल्याने तिच्या वडिलांच्या व्हॉटसअपवर पाठविले़

‘ती’ समजावत होती, पण…
 निकिताने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकायला तयार नव्हता. याआधीही त्याने असाच प्रकार केला होता़  ‘मी तुझ्यासाठी काहीही करेन, मी माझा जीवपण देईल’ असेही तो म्हणायचा़  आत्महत्येची धमकी नेहमीची असल्याने निकिताने लक्ष दिले नाही़,  पण यावेळी त्याची धमकी पोकळ नव्हती तर यावेळी त्याने खरोखरच गळफास घेऊन आत्महत्या केली़.

‘लोक म्हणतात मी त्याला मारलंय’
 16 जुलैला दुपारी 3-4 वाजताच्या सुमारास वडील शेतात धाण रोवणीसाठी गेले. त्यानंतर निकिताने गळफास लावून आत्महत्या केली़  आत्महत्येपूर्वी तिने ‘अतुल तिच्यामुळे नाही मेला आणि तिला पण महित नाही की तो का मेला. तरीपण गावातील लोक तिला म्हणत आहेत की, तिने मारले’ अशी सुसाईड नोट लिहिली. जी देवलापार पोलिसांच्या ताब्यात आहे़.