तडीपार गुन्हेगार गावात येताच  विशेष पथकाने केले जेरबंद

अकोला,

अकोट तालुक्यातील वडाळी देशमुख येथील तडीपार 52 वर्षिय गुन्हेगार श्रीधर पवार गावात परतल्याची गोपनीय बातमी मिळताच, जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलींद बहाकार यांच्या चमूने सापळा रचून त्याला शिताफीने पकडले. वडाळी येथील गजानन महाराज मंदिरातून त्याला ताब्यात घेण्यात आले.

   या आरोपीस उपविभागीय दंडाधिकारी अकोट यांनी 24 सप्टेबर 2019 रोजी एक वर्षाकरिता अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, बुलडाणा या पाचही जिल्ह्यातून तडीपार केले आहे. आरोपीवर हत्येचा प्रयत्न, अवैध दारूविक्रीसह अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. विनापरवानगी जिल्ह्यात प्रवेश केल्याने आरोपीवर मुंबई पोलिस कायद्याच्या कलम 142 नुसार अकोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत वाघुर्डे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक मिलींदकुमार बहाकार यांच्या पथकाने केली.

बहाकार पदावर कायम

नविन पोलिस अधीक्षक आल्यावर विशेष पथकाचे प्रमुखपदी नवीन अधिका-याची वर्णी लागते काय? अशी चर्चा सुरू होती. मात्र मिलींदकुमार बहाकार यांच्या कार्यशैलीमुळे ते पदावर कायम आहेत.