तानियाला व्हायचयं भूवैज्ञानिक

  •  परिस्थितीशी संघर्ष
  •  आई शिकवणी वर्ग घेवून चालविते कुटुंब

मनीष गोतमारे 

कळमेश्वर,

‘मंजिले उन्ही को मिलती है जिनके सपनो में जान होती है।  सिर्फ पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है।’या हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतील ओळी तालुक्यातील सुसुंद्री येथील तानिया पालिवाल (Taniya Paliwal) हिने खऱ्या करून दाखविल्या आहे़  तिने परिस्थितीचा बावू न करता संघर्ष करीत बारावीच्या परिक्षेत घवघवीत यश मिळविले. आईच्या कष्टाचे पाईक करण्यासाठी भूवैज्ञानिक बनायचे असल्याचे तानियाने नवराष्ट्रशी बोलताना सांगितले़.  

वडिलांचा आधार नाही. त्यामुळे घरात कमाविणारी आई एकटीच. ती कशीबशी गावात शिकवणी वर्ग घेऊन कुटुंबाचा गाडा चालविते़  एकवेळ पोटाला चिमटा काढील मात्र, मुलींना शिकविण्याची आईची तयारी. त्यामुळे तीची नेहमीच मुलींच्या शिक्षणासाठी धडपड सुरू असते़  आई आपल्या शिक्षणासाठी कष्ट उपसत असल्याची जाणीव दोन्ही मुलींना असल्याने त्यांनी कधीही परिस्थितीचा बावू केला नाही़  परिस्थितीशी संषर्घ करायचा अन् यशाला गवसनी घालयचा म्हणून मिळेत त्या स्थितीत दोन्हींनीही अभ्यास सुरू केला़ थोरली बहिन प्रियांशी दहावी व बारावीमध्ये मेरीटी आली़  तानियानेही तिच्याच पावलावर पाऊल टाकले़  कुणाचे कुठलेही मार्गदर्शन, शिकवणी वर्ग नसताना तानियाने कळमेश्वर येथील जिंदल विद्यालयातून (89) टक्के घेऊन दहावी तर मोहपा येथील न्यु इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालयातून 12 वीची परीक्षा दिली़  या परीक्षेत कढोर परिश्रम, जिद्द व सातत्याच्या भरो सहाशावर विज्ञान शाखेत (78) टक्के गुण प्राप्त केले़.  

पोटाला चिमटा काढील मात्र, मुलींना शिकविण

कला शाखेतून पदवीधर असलेली आई छायाने सांगितले की, घरातील परिस्थिती नाजूक असताना कधी त्यांच्या शिक्षणाचा खर्च पेलवेनासा होत होता़  मात्र, परिस्थितीशी संघर्ष करून आपल्याला पुढे जायचे आहे. अशी जिद्द मी नेहमीच मुलींनमध्ये निर्माण करायची़  माझ्या कष्टाचे दोन्ही मुलींनी चिज केल्याचे सांगत असताना आजपर्यत दु:खाचे अश्रू लपविणाऱ्या छायाने आनंदाश्रूना वाट मोकळी करून दिली़  तर बारावीच्या यशानंतर काय ? असा प्रश्न केला असता आता भूवैज्ञानिक बनायचे असून त्यासाठीची तयारीही सुरू केल्याचे तानियाने सांगितले़.