चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना प्रति कुटुंब दहा हजारांची मदत जाहीर

चंद्रपूर. विदर्भात पुराने (Flood in vidarbha) थैमान घातले असल्याने लाखो लोकं यामुळे प्रभावित झाले आहे. पुराचा फटका बसल्याने हजारो कुटुंब उध्वस्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना प्रति कुटुंब दहा हजार रुपयांची तातडीची मदत देणार असल्याची घोषणा आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत पूरग्रस्तांच्या खात्यात  पैसे जमा केले जाणार आहेत. जिल्ह्यातील आठ ते नऊ हजार कुटुंबियांना ही मदत मिळणार आहे. त्यानंतर सर्व्हे करून पुर्णतः उध्वस्त झालेल्या घरांना ९५ हजार रुपये, घर दुरुस्तीसाठी ५० हजार रुपये आणि अंशतः पडझड झाली असेल तर १५ हजार रुपये दिले जाणार आहेत.


पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १८ हजारांची मदत देणार दिली जाणार आहे. धान, सोयाबीन आणि कापूस उत्पादकांचा त्यात समावेश असेल. दरम्यान, भंडारा-गोंदिया जिल्ह्यातला पूर आता ओसरला असला तरी मात्र या पुरात घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.